टी-२० आयसीसी क्रमवारीत भारताचा बुमरा दुसऱ्या स्थानी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

दुबई - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. फलंदाजीत विराट कोहलीने आपले आघाडीचे स्थान कायम राखले. पाकिस्तानचा लेगस्पिनर इमान वसिम याने दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरला मागे टाकून गोलंदाजीत आघाडीचे स्थान पटकावले आहे. आयसीसीने नवी क्रमवारी सोमवारी जाहीर केली. फलंदाजीच्या क्रमवारीत बदल झालेला नाही. भारताचा कर्णधार कोहली, ऑस्ट्रेलियाचा ॲरॉन फिंच आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्सन पहिल्या तीन क्रमांकावर कायम आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशाच्या शकिब अल हसन याने आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे.

दुबई - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. फलंदाजीत विराट कोहलीने आपले आघाडीचे स्थान कायम राखले. पाकिस्तानचा लेगस्पिनर इमान वसिम याने दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरला मागे टाकून गोलंदाजीत आघाडीचे स्थान पटकावले आहे. आयसीसीने नवी क्रमवारी सोमवारी जाहीर केली. फलंदाजीच्या क्रमवारीत बदल झालेला नाही. भारताचा कर्णधार कोहली, ऑस्ट्रेलियाचा ॲरॉन फिंच आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्सन पहिल्या तीन क्रमांकावर कायम आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशाच्या शकिब अल हसन याने आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. ग्लेन मॅक्‍सवेल दुसऱ्या; तर अफगाणिस्तानचा महंमद नाबी तिसऱ्या स्थानी आहे. सांघिक क्रमवारीत इंग्लंडने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. न्यूझीलंड १२५ गुणांसह आघाडीवर आहे. इंग्लंडचे १२३ गुण झाले आहेत. पाकिस्तान तिसऱ्या; तर भारत चौथ्या स्थानावर आहेत. विंडीज पाचव्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका संघ प्रथमच पहिल्या पाचातून बाहेर पडले आहेत.