राजस्थानच्या हितासाठी ललित मोदींची ‘एक्‍झिट’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

लंडन - आयपीएलचे जन्मदाते आणि तेव्हापासून नेहमीच वादात असलेले, अनेक आरोपांमुळे परदेशात वास्तव्यास असलेले ललित मोदी यांनी राजस्थान क्रिकेटचे हित लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट प्रशासनाला अलविदा केला आहे. ज्या नागौर जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते ते पद त्यांनी सोडले आहे.

राजीनाम्याचे तब्बल तीन पानांचे पत्र त्यांनी बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष राहुल जोहरी यांना पाठवले. राजस्थान क्रिकेटला पुन्हा चांगले दिवस यावेत, असे त्यांनी म्हटले आहे. हे तीन पानी पत्र ललित मोदी यांनी ट्विटवर पोस्ट केले आहे. 

ललित मोदी राजस्थान क्रिकेटशी संबंधित असल्याचा फटका राजस्थान क्रिकेटला बसत होता. बीसीसीआयने त्यांच्यावर बंदी घातली होती. आता मोदी दूर गेल्यामुळे राजस्थान क्रिकेटवरील बंदी रद्द होईल, तसेच या ठिकाणी पुन्हा आंतरराष्ट्रीय सामने होण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच बीसीसीआयकडून मिळणारा १०० कोटींचा वाटाही आता राजस्थान क्रिकेटला पुन्हा मिळू शकेल.

राजस्थान रॉयल्सलाही फायदा?
दोन वर्षांच्या बंदीनंतर यंदापासून राजस्थान रॉयल्स हा संघ पुन्हा आयपीएलमध्ये येणार आहे. मोदींमुळे बीसीसीआयची बंदी असल्यामुळे राजस्थान रॉयल्सचे सामने राजस्थानमध्ये होत नव्हते. आता पुन्हा येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलचे सामने रंगू शकतील.

Web Title: sports news lalit modi exit