लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

मलिंगावर एक वर्षांची बंदी घालताना त्याच्या सामन्याच्या मानधनातून 50 टक्के दंडही वसूल करण्याचे आदेश मंडळाकडून देण्यात आले आहे.

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता माध्यमांशी बोलल्याबद्दल श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

चॅंपियन्स करंडक स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लसिथ मलिंगाला चौकशीला सामोरे जावे लागले. श्रीलंका क्रिकेट मंडळाने त्याच्या चौकशीसाठी तीनसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. मलिंगावर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याने श्रीलंका क्रीडामंत्र्यांच्या क्रिकेटच्या ज्ञानाबाबत उघडपणे टिप्पणी केली होती. त्याचबरोबर भारतावर विजय मिळविला तेव्हा कुणी श्रीलंकेच्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा विषय काढला नाही. मग, हरल्यावरच का? अशी विचारणा केली होती.

मलिंगावर एक वर्षांची बंदी घालताना त्याच्या सामन्याच्या मानधनातून 50 टक्के दंडही वसूल करण्याचे आदेश मंडळाकडून देण्यात आले आहे. क्रिकेट मंडळाच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच : खासदार संभाजीराजे
फेसबुकवरील सक्रिय युजर्सची संख्या 200 कोटींवर!​
मुंबई: प्रकृती अस्वस्थामुळे मुस्तफा डोसा रुग्णालयात​
पुणे: आंद्रा धरणग्रस्तांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा
प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीचादेखील अर्ज​
रॅन्समवेअरचा पुन्हा हल्ला​
वसुली, पीककर्जाचा प्रश्‍न कायम
कर्जमाफीनंतर आता कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री​