२०२१ वर्ल्डकप खेळण्याचे मितालीचे सूतोवाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली - भारताची महिला क्रिकेट कर्णधार मिताली राज हिने २०२१च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे सूतोवाच केले आहे. या स्पर्धेतील सहभागाची शक्‍यता मी फेटाळून लावत नाही. तेव्हा फॉर्म आणि तंदुरुस्ती साथ देत असल्यास मी खेळण्यासाठी उपलब्ध असेन, असे सूचक वक्तव्य तिने केले.

दरम्यान, दुसऱ्या आयसीसी वन-डे स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला. मिताली आणि माजी कर्णधार अंजूम चोप्रा यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली. २०१७ ते २०२० दरम्यान ही स्पर्धा होईल. पहिल्या फेरीत पुढील वर्षी भारताची दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची मालिका होईल. पाच व सात फेब्रुवारी रोजी किंबर्लीमध्ये पहिले दोन सामने होतील. त्यानंतर पॉट्‌चेफस्ट्रूममध्ये दहा फेब्रुवारीला तिसरा सामना होईल.