वर्ल्डकप ते वर्ल्डकप हीच का चालना?

शैलेश नागवेकर
गुरुवार, 27 जुलै 2017

मिताली राजचा संघ आता थेट पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

मुंबई - इंग्लंडमध्ये नुकत्याच संपलेल्या महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तरी मिताली राजच्या भारतीय संघाने सर्वांची वाहव्वा मिळवली. मंगळवारी मध्यरात्री या रणरागिणी मुंबईत परतल्यानंतर त्यांचे भव्य स्वागतही झाले. त्यांच्या पराक्रमाचे गोडवेही गायले जाऊ लागले. महिला क्रिकेटच्या प्रगतीबाबत आश्‍वस्त करण्यात येत असले तरी वास्तव मात्र वेगळे आहे. कारण हा संघ आता थेट पुढच्या वर्षी ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेतच खेळण्याची शक्‍यता आहे.

महिला क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी त्यांना अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळायला हवेत, अशी आशा बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांपासून सर्व जण व्यक्त करत आहे. या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर ही मागणी अधिकच जोर पकडू लागली आहे; पण विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर आता लगेचच या महिला संघाला पुढचा आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळायला मिळणार हे अनिश्‍चित आहे.

मिताली राजच्या भारतीय संघाच्या सर्व रणरागिणी मुंबईत दाखल झाल्यानंतर मध्यरात्री झालेले स्वागत त्यांनाही नवे होते. आज सकाळी बीसीसीआयने या सर्व खेळाडूंना मीडियासमोर आणले. इंग्लंडचे मैदान गाजवणाऱ्या या महिलांचा पुढील आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे, या प्रश्‍नावर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडे त्याचे उत्तर नव्हते. पुढील वर्षी ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे या स्पर्धेच्या तयारीसाठी अगोदर काही सामने होण्याची शक्‍यता आहे.

पन्नास लाख कमी की जास्त?
उपांत्य सामना जिंकताच बीसीसीआयने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले. पुरुषांच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे, ही पुरेशी आहे? हा उसळत्या चेंडूप्रमाणे असलेला प्रश्‍न मितालीने शिताफीने सोडून दिला. केवळ चेहऱ्यावर हास्य ठेवले होते.

आता आम्ही सिद्ध केलंय
भारतात महिलांसाठी आयपीएलसारखी स्पर्धा असावी का, या प्रश्‍नावर मितालीने उत्तर दिले. हा प्रश्‍न अगोदर विचारण्यात आला असता तर मी वेगळे उत्तर दिले असते; पण आम्ही सिद्ध करून दाखवलंय. या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर आमचा दर्जा उंचावला आहे. ही तर नव्या युगाची सुरवात आहे. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटपासूनचा निर्णय घ्यायचा आहे.

भाऊ हाच माझा आयडॉल - स्मृती
भावाकडे पाहून मी क्रिकेटकडे वळले. तो डावखुरा फलंदाजी करायचा. मी मुळात उजवी (राईट हॅंड) असली तरी मला उजव्या हातात बॅट पकडायचे माहीत नव्हते. भाऊ डावखुरा होता. मीही डावखुरी फलंदाज झाले. त्यामुळे भाऊ हाच माझा आयडॉल आहे, असे सांगलीच्या स्मृती मानधनाने 
सांगितले.