जागतिक क्रिकेट संघावर पाकिस्तानचा विजय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

लाहोर - पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संघाविरुद्ध खेळण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा उठविला. स्वातंत्र्य करंडक टी-२० लढतीत पाकने जागतिक संघावर २० धावांनी मात केली. जागतिक संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसी याने नाणेफेक जिंकून पाकला फलंदाजी दिली. फखर झमानने पहिल्या दोन चेंडूवर मॉर्नी मॉर्कलला दोन चौकार मारले; पण चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. अहमद शहजाव व बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी रचली. माजी कर्णधार शोएब मलिकने जोरदार टोलेबाजी केली. पाकने अखेरच्या तीन षटकांत ४८ धावा फटकावल्या. यात थिसारा परेरा याने टाकलेल्या शेवटच्या षटकात २१ धावा गेल्या.

लाहोर - पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संघाविरुद्ध खेळण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा उठविला. स्वातंत्र्य करंडक टी-२० लढतीत पाकने जागतिक संघावर २० धावांनी मात केली. जागतिक संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसी याने नाणेफेक जिंकून पाकला फलंदाजी दिली. फखर झमानने पहिल्या दोन चेंडूवर मॉर्नी मॉर्कलला दोन चौकार मारले; पण चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. अहमद शहजाव व बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी रचली. माजी कर्णधार शोएब मलिकने जोरदार टोलेबाजी केली. पाकने अखेरच्या तीन षटकांत ४८ धावा फटकावल्या. यात थिसारा परेरा याने टाकलेल्या शेवटच्या षटकात २१ धावा गेल्या. यात इमाद वसिमने चौथ्या व सहाव्या चेंडूवर षटकार खेचले.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान - २० षटकांत ५ बाद १९७ (अहमद शहजाद ३९, बाबर आझम ८६-५२ चेंडू, १० चौकार, २ षटकार, शोएब मलिक ३९-२० चेंडू, ४ चौकार, २ षटकार, इमाद वसिम नाबाद १५-४ चेंडू, २ षटकार) विवि जागतिक संघ ः २० षटकांत ७ बाद १७७ (हशीम आमला २६, फाफ २९, डॅरेन सॅमी नाबाद २९, सोहेल खान २-२८, रुम्मन रईस २-३७, शदाब खान २-३३)