महाराष्ट्र डावाने पराभूत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

गहुंजे - कट्टर प्रतिस्पर्धी कर्नाटकविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राला घरच्या मैदानावर एक डाव आणि १३६ धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनने ६६ धावांत निम्मा संघ गारद केला. 

घरच्या मैदानावर मोसमातील पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राची गोलंदाजीत शोकांतिका, तर फलंदाजीत अधोगती झाली. ३८३ धावांच्या पिछाडीनंतर महाराष्ट्राची ४ बाद १३५ अशी अवस्था झाली होती. डावाचा पराभव टाळण्यासाठी आणखी २४८ धावांची गरज होती, पण महाराष्ट्राचा डाव २४७ धावांत आटोपला.

ऋतुराज-त्रिपाठी जोडीवर महाराष्ट्राच्या आशा होत्या. ऋतुराज ६१ धावांत आणखी चारचीच भर घालू शकला. दिवासीतल चौथ्याच षटकात मिथुनने त्याला बाद केले. पहिल्या डावातील शतकवीर त्रिपाठी वेगवान अर्धशतकानंतर परतला. मिथुननेच त्याला बाद केले. पुढच्याच षटकात मिथूनने चिरागला यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडले. मिथुनची ही डावातील तिसरी विकेट होती. त्यावेळी महाराष्ट्राचे सर्व मान्यताप्राप्त फलंदाज परतले होते. तेव्हा ७ बाद १७८ अशी अवस्था होती. यष्टिरक्षक-फलंदाज मोटवानीने एकाकी प्रतिकार केला, पण दुसऱ्या बाजूने तळाचे फलंदाज हजेरी लावून परतले. करुण नायरने प्रदीप दाढेचा त्रिफळा उडवून विजयावर थाटातच शिक्कामोर्तब केले.

आघाडी कायम
कर्नाटकने बोनस गुणाची कमाई केली. सलग तिसऱ्या विजयासह त्यांचे २० गुण झाले. दिल्लीने उत्तर प्रदेशला हरवून दुसरा विजय मिळविला. दिल्ली १६ गुणांसह दुसऱ्या, तर रेल्वे १३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्र सात संघांच्या ‘अ’ गटात सात गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र २४५ व ६६.२ षटकांत सर्व बाद २४७ (ऋतुराज गायकवाड ६५-१३० चेंडू, १० चौकार, राहुल त्रिपाठी ५१-५५ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, रोहित मोटवानी नाबाद ४९-७५ चेंडू, ९ चौकार, चिराग खुराणा ४, निकीत धुमाळ १५, ए. मिथून ५-६६, रोहित मोरे २-२५, करुण नायर १-१) पराभूत विरुद्ध कर्नाटक ः ५ बाद ६२८ घोषित.