एकदिवसीय क्रिकेटमध्ये रशिद खानचे झटपट १०० बळी

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

हरारे - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज रशिद खान याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये झटपट १०० गडी बाद करण्याची किमया साधली. पात्रता फेरीच्या अंतिम लढतीत त्याने वेस्ट इंडीजच्या शई होपला बाद करून ही कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने सर्वांत वेगवान १०० गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याने ४४ सामन्यांत १०० गडी बाद केले. यापूर्वीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कच्या (५२ सामन्यांत) नावावर होता.

रशिदची कामगिरी
१०० विकेट्‌स    ४४ सामने
५० विकेट्‌स     २६ सामने

Web Title: sports news rashid khan cricket Afghanistan