बीसीसीआयच्या अभ्यास समितीत सौरभ गांगुली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

मुंबई - लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी नियुक्त केलेल्या समितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याचा समावेश केला आहे. अशा प्रकारची अभ्यास समिती नियुक्त करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. 

ही समिती आता दोन दिवसांत आपल्या कामाला सुरवात करणार असून, लवकरात लवकर आपला अहवाल ‘बीसीसीआय’ला देणार आहे. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात नेमक्‍या काय अडचणी आहेत, याचा अभ्यास ही समिती करेल. या समितीचे अध्यक्षपद राजीव शुक्‍ला यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. गांगुलीसह नबा भट्टाचार्यजी, टी. सी. मॅथ्यू, जय शहा, अमिताभ चौधरी व अनिरुद्ध चौधरी यांचा या समितीत समावेश आहे.
लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीत पदाधिकाऱ्यांची ७० वर्षे वयाची अट, तीन वर्षांनंतरचे ‘कूलिंग’ व एक राज्य, एक मत हे तीन कळीचे मुद्दे आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालय आणि त्यांनी नेमलेली प्रशासन समिती सर्वच्या सर्व शिफारशी अमलात आणण्यास ठाम असताना कालच्या बैठकीत ७२ वर्षीय व नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले एन. श्रीनिवासन तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीवरून काही तांत्रिक मुद्दे पुढे आले होते. तेव्हा संलग्न संघटनांनी बैठकीसाठी कोणाला नियुक्त करायचे, हा त्यांचा प्रश्‍न आहे. त्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासक समितीला नसून केवळ सर्वोच्च न्यायालयाला असल्याचे समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी स्पष्ट केले होते.