श्रीलंका दौऱ्यासाठी धवनला संधी

पीटीआय
मंगळवार, 18 जुलै 2017

मनगटाच्या दुखापतीमुळे मुरली विजयची माघार

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी सलामीचा फलंदाज शिखर धवनचा समावेश करण्यात आला आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे मुरली विजयने माघार घेतल्यामुळे धवनला संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच मुरली विजयला मनगटाची दुखापत झाली होती. त्यातून तो बरा होत होता; पण सराव सामना खेळताना त्याच्या उजव्या मनगटात पुन्हा वेदना जाणवू लागल्यामुळे त्याने दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय समितीनेदेखील त्याला त्याचा सध्या सुरू असलेला पुनर्वसन कार्यक्रम चालू ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

धवन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान टिकवून असला तरी, २०१६ मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. भारतीय संघ या दौऱ्यात तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी २० सामना खेळेल.