श्रीलंका क्रिकेट संघाच्या कामगिरीची आता चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीची चौकशी करण्याचे तेथील क्रीडामंत्र्यांनी ठरवले आहे; पण त्याचे श्रीलंका क्रिकेट संघाच्या कामगिरीची आढावा बैठक असे नामकरण करण्यात आले आहे. माजी क्रिकेट प्रशासन, खेळाडू, क्रीडा तज्ज्ञ तसेच पत्रकारांची एकत्रित बैठक घेऊन त्यात श्रीलंकेच्या क्रिकेट प्रगतीसाठीचे उपाय निश्‍चित करण्यात येतील, असे क्रीडामंत्री दयासिरी जयशेखरा यांनी सांगितले. 

प्रशासक किंवा खेळाडूंना दोष देऊन प्रश्‍न सुटणार नाही. कोणावर ठपका ठेवूनही काही साध्य होणार नाही. त्यासाठी कामगिरीचे सखोल मूल्यमापन हवे आहे, असे क्रीडा मंत्र्यांनी सांगितले. श्रीलंका क्रिकेट मंडळ बडतर्फ केले, तर आयसीसीची कारवाई होऊ शकेल. हा काही उपाय होत नाही. क्रिकेट प्रशासनात हस्तक्षेप करण्याचीही आमची इच्छा नाही, असे जयशेखरा यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी जयशेखरा यांनी श्रीलंका संघातील खेळाडूंची ढेरपोट्या असे म्हणत हेटाळणी केली होती. त्याचबरोबर तंदुरुस्त खेळाडूंनाच संघात ठेवण्यात येईल, असे सांगितले होते. 

श्रीलंका क्रिकेट बरखास्त करण्याची मागणी अर्जुन रणतुंगा सातत्याने करत आहेत. ते २०१६ च्या क्रिकेट मंडळाच्या निवडणुकीत पराजित झाले होते, याकडे क्रिकेट तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत.