अखेरच्या श्‍वासापर्यंत विद्यार्थीच राहणार - सचिन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई - कपिल देव यांनी विश्‍वकरंडक उंचावलेला तो क्षण पाहिला त्यापासून मी खेळाडू होण्याचा घेतलेला ध्यास आता निवृत्त झालो तरीही कायम आहे.

आचरेकर सर आणि भाऊ अजित हे माझे गुरू आहेत. तेव्हा विद्यार्थी होतो आणि अखेरचा श्‍वास घेईपर्यंत विद्यार्थीच राहणार आहे, असे सचिन म्हणाला. सतत शिकत राहण्याची वृत्तीच तुम्हाला प्रगतीचा मार्ग दाखवत असते, असेही त्याने सांगितले.

सोनी टीव्हीच्या क्रीडा वाहिन्यांचा सचिन ब्रॅण्ड ॲम्बेसिडर झाला. या  कार्यक्रमात सचिनने विविध विषय, खेळ तंदुरुस्ती यावर मत प्रदर्शन केले. त्याचबरोबर नवोदितांनाही सोफ्यावर बसून खेळाची आवड निर्माण करण्यापेक्षा मैदानात उतरून खेळ करण्याचाही सल्ला दिला.

१७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा भारतात होत आहे. या स्पर्धेतून आपल्या देशात फुटबॉल क्रांती होईल. आपल्या संघाला प्रोत्साहन देऊच; पण संपूर्ण स्पर्धेला पाठिंबा देऊन आपण इतर खेळांनाही तेवढेच सपोर्ट करतो हे दाखवून देण्याची योग्य वेळ आहे, असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
२०२० पर्यंत आपला देश तरुणांचा असणार असे बोलले जात आहे; पण लठ्ठपणात आपला देश सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, ही त्याची दुसरी बाजू आहे. त्यामुळे सोफ्यावरून उठा आणि तुम्हाला आवडेल तो खेळ खेळा, असे सचिनने सांगितले.

रिओ ऑलिंपिकला मी उपस्थित होतो. तेथे आपल्या खेळाडूंनी घेतलेली मेहनत मी जवळून पाहिली; यात दीपा कर्माकरची जिद्द आपल्याला अधिक भावली, असे त्‍याने सांगितले.