कोहली-धवन जोडीने मोडला सचिन-द्रविडचा विक्रम

पीटीआय
सोमवार, 12 जून 2017

यापूर्वी 30 वेळा धवन आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचली आहे. त्यांनी केलेल्या 31 भागीदाऱ्यांमध्ये पाचवेळा 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे तर सातवेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. त्यांनी आजवर 53च्या सरासरीने 1590 धावा केल्या आहेत.

इंग्लंड : चॅंपियन्स करंडक स्पर्धेत भारताने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीवर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करत कळस चढवला. धवन आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी रचली.

धवन आणि कोहली यांनी रविवारी एक नवीन विक्रम केला. भारताकडून खेळताना दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करण्यात धवन आणि कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचले. यापूर्वी 30 वेळा धवन आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचली आहे. त्यांनी केलेल्या 31 भागीदाऱ्यांमध्ये पाचवेळा 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे तर सातवेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. त्यांनी आजवर 53च्या सरासरीने 1590 धावा केल्या आहेत.

भारताकडून खेळताना शतकी भागीदारी करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर द्रविड आणि सचिन, गंभीर आणि कोहली, गंभीर आणि सचिन आणि रोहित आणि कोहली या चार जोड्या आहेत. यांनी प्रत्येकी 4 शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तरीही या यादीत द्रविड आणि गांगुली हे अजूनही अव्वल आहेत. त्यांनी नऊ वेळा शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तर 39 वेळा दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचली आहे. द्रविड आणि गांगुली 60.67च्या सरासरीने 2370 धावा केल्या आहेत.