आयसीसी क्रमवारीत कोहली अव्वल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

दुबई - एकदिवसीय सामन्यात अव्वल क्रमांकावर येण्याच्या स्पर्धेत भारतीय संघ मागे राहिला असला, तरी वैयक्तिक क्रमवारीत फलंदाजीत पुन्हा एकदा विराट कोहली अव्वल स्थानावर आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १९४ डावांत सर्वांत वेगवान नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रमही त्याने केला. दहा दिवसांतील सातत्यपूर्ण कामगिरीने कोहलीने क्रमवारीत अव्वल स्थान भूषविताना दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलर्सला मागे टाकले. कोहलीचे ८८९ गुण झाले आहेत. भारताकडून क्रमवारीतील हे सर्वाधिक गुण ठरले आहेत. यापूर्वी १९९८ मध्ये सचिनचे ८८७ गुण होते. 

क्रमवारीत रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर कायम राहिला आहे. महेंद्रसिंह धोनी अकराव्या स्थानावर आला आहे.

गोलंदाजीत पाकिस्तानचा हसन अली आघाडीवर कायम असून, भारताचा जसप्रित बुमरा तिसऱ्या स्थानावर आला आहे. सांघिक क्रमवारीत तीन सामन्यांच्या मालिकेत एक सामना गमाविल्याने भारत अव्वल स्थानापासून दूरच राहिले. दक्षिण आफ्रिका १२१ गुणांसह अव्वल स्थानी असून, भारत केवळ दोन गुणांनी पिछाडीवर आहे.