श्रीलंकेला संधीच देणार नाही - विराट कोहली

पीटीआय
गुरुवार, 8 जून 2017

लंडन -  श्रीलंका संघ अपयशाच्या गर्तेत सापडला असला, तरी त्यांच्याकडे गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना डोके वर काढण्याची संधीच द्यायची नाही, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, ‘‘उद्याचा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्यावर अधिक दडपण आहे. मैदानावर हेच दडपण वाढविण्याचे आमचे प्रयत्न असतील.’’

पाकिस्तानविरुद्धच्या विजयी संघात बदल करण्यास कोहली उत्सुक दिसला नाही. तो म्हणाला, ‘‘खरे, तर संघ निवड ही माझी खरी डोकेदुखी ठरत आहे. इच्छा असूनही नियोजनाचा भाग म्हणून आम्हाला अश्‍विन, शमीसारख्या खेळाडूंना वगळावे लागत आहे. अर्थात, संघ निवडीसाठी आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत हे चांगले. हार्दिक पंड्याच्या समावेशाने आम्हाला अष्टपैलू खेळाडू मिळाला असे म्हणण्यापेक्षा त्याच्या समावेशामुळे संघ खऱ्या अर्थाने समतोल झाला असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. तो चांगल्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. तसेच, आक्रमक फलंदाजी हा त्याचा स्वभाव असला तरी तो गरजेनुसार मोठी खेळी करण्याचीही क्षमता  बाळगून आहे.’’