श्रीशांतवरील आजीवन बंदी बीसीसीआयकडून कायम

पीटीआय
बुधवार, 19 एप्रिल 2017

कोची - श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवण्याचा कोणताही विचार नाही, त्यामुळे ही बंदी त्याच्यावर कायम राहील, असे भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे. 

सामना निकाल निश्‍चित करण्याच्या आरोपावरून दिल्ली न्यायालयाने दोषमुक्त ठरवल्यामुळे आपल्यावरील बंदीचा फेरविचार करावा, अशी मागणी श्रीशांतने बीसीसीआयकडे केली होती.

शिस्तीचे पालनाच्या धोरणात बीसीसीआय ठाम आहे. २०१३ नंतर या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, अशा आशयाचे पत्र बीसीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी श्रीशांतला पाठवले आहे. आजीवन बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयचे तत्कालीन उपाध्यक्ष टी. एस. मॅथ्यू जे केरळ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते आणि कर्नाटक क्रिकेट संघटनेचे सचिव टी. एन. अनंतनारायण यांच्या समितीने घेतला होता. अरुण जेटली या समितीचे अध्यक्ष होते.

दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर श्रीशांतने आपल्यावरील बंदी उठवण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात मार्च महिन्यात याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना केरळ न्यायालयाने बीसीसीआयकडे फेरविचार करण्याची विनंती करण्याची सूचना श्रीशांतला केली होती.

आजीवन बंदीमुळे श्रीशांत बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही क्रिकेट सामन्यात खेळू शकत नाही किंवा सरावासाठी तो कोणत्या मैदानातही जाऊ शकत नाही.

Web Title: Sreesanth banned for life