पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा इनडोअर सराव; तर भारताचा रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

कोलकाता - दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीतही पावसाचा व्यत्यय येण्याची चिन्हे दिसत आहेत. बंगालमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. कोलकात्यात आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भारतीय संघाने आजचे सराव सत्र रद्द केले, तर ऑस्ट्रेलियाने इनडोअर सराव केला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तसेच मॉन्सूनही त्यात सक्रिय आहे, असे भारतीय हवामान खात्याच्या कोलकाता केंद्राचे संचालक गणेश दास यांनी सांगितले. मैदान खेळण्यायोग्य करण्यास किमान दोन तासांचे ऊन आवश्‍यक आहे. सामन्यास अजून दोन दिवस आहेत, ही चांगली बाब आहे.