धोनीचा आदर राखलाच पाहिजे - रैना

पीटीआय
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

कोलकता - महेंद्रसिंह धोनीने देशासाठी आणि आयपीएल संघासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याचा मान सदैव राखला पाहिजे, असे मी म्हणत नाही, तर अशी भावना क्रिकेट जगतात व्यक्त केली जात आहे, अशा शब्दांत आपल्या माजी कर्णधाराविषयी सुरेश रैनाने आदर व्यक्त केला.

धोनीवर सध्या जे दडपण टाकले जात आहे, त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर होत आहे का? यावर बोलताना रैना म्हणाला, ‘‘त्याच्या बॅटमधून धावा होतील, असा माझा विश्‍वास आहे. जम बसल्यानंतर त्याचा फॉर्म परतेल. वरच्या क्रमांकावर त्याने फलंदाजी केली तर त्याला धावा करण्याची चांगली संधी मिळेल, तो सर्वोत्तम फिनिशर आहे. आयपीएलमध्ये चेन्नई संघाबरोबरचा अनुभव हा सर्वोत्तम आहे.’’