व्यंकटेश प्रसाद निवड समितीचे अध्यक्ष

वृत्तसंस्था
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

अजय शिर्के यांची बिनविरोध निवड

बीसीसीआयच्या सचिवपदी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अजय शिर्के यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मुंबई - भारताची माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याची भारतीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संदीप पाटील यांच्याजागी प्रसादची निवड झाली आहे.

 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आज (बुधवार) झालेल्या वर्षिक सभेत नव्या निवड समितीची घोषणा केली. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील समितीची मुदत संपल्यानंतर ही नवी समिती निवडण्यात आली आहे. दक्षिण विभागाचे प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आलेल्या प्रसादला समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. या समितीत उत्तर विभागाकडून सरणदीप सिंग, पश्चिम विभागाकडून अबी कुरवेला, पूर्व विभागाकडून सुब्रतो बॅनर्जी आणि मध्य विभागाकडून राजेश चौहान यांना निवडण्यात आले आहे.