बंगालचा महाराष्ट्रावर चित्तथरारक विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

नवी दिल्ली - बंगालने विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर चार विकेट आणि एक चेंडू राखून चित्तथरारक विजय मिळविला. याबरोबरच बंगालने उपांत्य फेरी गाठली. बंगालची उपांत्य फेरीत झारखंडशी लढत होईल.

नवी दिल्ली - बंगालने विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर चार विकेट आणि एक चेंडू राखून चित्तथरारक विजय मिळविला. याबरोबरच बंगालने उपांत्य फेरी गाठली. बंगालची उपांत्य फेरीत झारखंडशी लढत होईल.

महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधवने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. संथ सुरवातीनंतर महाराष्ट्राने 6 बाद 318 धावा केल्या. अंतिम टप्यात बंगालची आवश्‍यक धावगती साडेआठच्या घरात गेल्यानंतरही महाराष्ट्राचे गोलंदाज अपयशी ठरले. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी व अग्नीव पान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भर घातली होती.

त्यानंतर बंगालने विकेट हाताशी ठेवत बाजी मारली. सुदीप चॅटर्जी-अनुष्टुप मुजुमदार यांनी पाचव्या विकेटसाठी 117 धावांची 93 चेंडूंमध्ये केली. तीच निर्णायक ठरली. मुंढेने 49व्या षटकात मुजुमदारला बाद केले, पण चॅटर्जीने एकाग्रता ढळू दिली नाही. त्याच षटकात त्याने मुंढेला षटकार खेचला. नवा फलंदाज आमीर गनी याने अखेरच्या षटकात पाचव्या चेंडूवर काझीला विजयी चौकार मारला. मोक्‍याच्या क्षणी महाराष्ट्राला क्षेत्ररक्षणात चपळाई दाखविता आली नाही.

फलंदाजीत अंकित बावणेला सलामीला बढती देण्याचा प्रयोग फसला.
तत्पूर्वी, महाराष्ट्राला शतक फलकावर लावण्यासाठी 23व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. कर्णधार केदार अर्धशतकाककेड वाटचाल करील होता, पण गनीने त्याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर त्रिपाठीने 95 धावांची खेळी केली. यष्टिरक्षक-फलंदाज निखिल नाईकने उपयुक्त फटकेबाजी केली. अखेरच्या दहा षटकांत 109 धावांची भर पडली.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र - 50 षटकांत 6 बाद 318 (ऋतुराज गायकवाड 43-68 चेंडू, 6 चौकार, अंकित बावणे 14, नौशाद शेख 3, केदार जाधव 44-45 चेंडू, 7 चौकार, राहुल त्रिपाठी 95-79 चेंडू, 9 चौकार, 4 षटकार, निखिल नाईक 63-52 चेंडू, 2 चौकार, 5 षटकार, श्रीकांत मुंढे नाबाद 20-10 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, शमशुझ्मा काझी नाबाद 20-12 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, प्रग्यान ओझा 1-58, सायन घोष 2-61, आमीर गनी 2-70) पराभूत विरुद्ध बंगाल - 49.5 षटकांत सहा बाद 320 (श्रीवत्स गोस्वामी 74-88 चेंडू, 7 चौकार, अग्नीव पान 47-37 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, मनोज तिवारी 40-50 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, सुदीप चॅटर्जी नाबाद 60-51 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, अनुष्टुप मुजुमदार 66-59 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, निकीत धुमाळ 7-1-47-0, श्रीकांत मुंढे 8-0-51-2, शमशुझ्मा काझी 7.5-0-47-2, जगदीश झोपे 8-0-61-0, सत्यजित बच्छाव 10-0-61-0, केदार जाधव 6-0-30-2)