महाराष्ट्राकडून दिल्ली गारद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

कटक - महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या दिल्लीला १९५ धावांनी गारद केले. महाराष्ट्राने सलग तिसऱ्या विजयासह गुणतक्‍त्यात अव्वल स्थान गाठले. कर्णधार केदार जाधवचे शतक आणि जगदीश झोपेच्या पाच विकेट महाराष्ट्राच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

महाराष्ट्र व तमिळनाडू प्रत्येकी तीन सामने जिंकून ‘ब’ गटात आघाडीवर आहेत. तमिळनाडूने हिमाचल प्रदेशला आठ विकेट राखून हरविले. महाराष्ट्राचा नेट रनरेट +२.२८०, तर +१.४३७ आहे. बुधवारी हे दोन संघ आमनेसामने येतील.

धनेश्वर रथ संस्थेच्या मैदानावर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला फलंदाजी दिली. फॉर्मात असलेल्या महाराष्ट्राच्या फलंदाजांनी ८ बाद ३६७ धावा केल्या. दिल्लीचा डाव ३४ व्या षटकांत १७२ धावांत आटोपला.

महाराष्ट्राने सलग तिसऱ्या सामन्यात त्रिशतकी टप्पा पार केला. अनुभवी आशिष नेहराचा समावेश असलेल्या दिल्लीच्या गोलंदाजीची धुलाई झाली. केदारने ११ चौकारांच्या जोडीला आठ षटकार खेचले. त्याला नौशाद व निखिलकडून चांगली साथ मिळाली. नौशादसह त्याने तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी केदार-निखिल यांनी ५९ धावा फटकावल्या. सरासरीने ७९ धावांची भर घातली.

दिल्लीने चांगल्या सुरवातीनंतर दिल्लीने लागोपाठ चार षटकांत चार विकेट गमावल्या. दहाव्या षटकात धुमाळने थेट फेकीवर धवनला धावचीत केले. ११व्या षटकात दाढेने शोरीला, १२व्या षटकात धुमाळने पंतला, तर १३व्या षटकात दाढेने राणाला बाद केले. त्यामुळे बिनबाद ६४ वरून दिल्लीची ४ बाद ७५ अशी स्थिती झाली. गंभीर-मिलिंद यांनी ७५ धावांची भागीदारी रचली, पण झोपेने या दोघांना बाद केले. त्यानंतर दिल्लीने ठराविक अंतराने विकेट गमावल्या.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र ः ५० षटकांत ८ बाद ३६७ (विजय झोल ३५, नौशाद शेख ५२, केदार जाधव ११३-६४ चेंडू, ११ चौकार, ८ षटकार, निखिल नाईक ६३, अंकित बावणे २९, आशिष कुलवंत खेज्रोलिया २-३५, नवदीप सैनी २-७६, नितीश राणा २-४२),  विवि दिल्ली ः ३३.४ षटकांत सर्व बाद १७२ (शिखर धवन २४, गौतम गंभीर ५३, मिलिंद कुमार ३८, प्रदीप दाढे २-४८, जगदीश झोपे ५-१९)

Web Title: vijay hazare trophy