विराटची आक्रमकता कौतुकास्पद - रिचर्डस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - विराट कोहलीचा दर्जा फार मोठा आहे. केवळ फलंदाज म्हणूनच नाही तर कर्णधार म्हणूनही त्याची आक्रमकता कौतुकास्पद आहे, असे मत आक्रमक फलंदाजीचे बादशहा व्हिव रिचर्डस यांनी मांडले. विराट कोहली केवळ आक्रमकच नाही, तर तो सर्व परिस्थितीत आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो हे सर्वांत महत्त्वाचे आहे, असेही रिचर्डस म्हणाले.

मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेल्या रिचर्डस यांनी, भारतीय क्रिकेट आणि नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसंदर्भातही आपल्या शैलीत मत व्यक्त केले. स्लेजिंगबाबत ते म्हणाले, जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना टार्गेट करता, तेव्हा तुमच्या दिशेने होणाऱ्या स्लेजिंगचा सामना करण्याचीही तयारी ठेवायला हवी. एका मर्यादेपर्यंत स्लेजिंग ठीक असते; परंतु प्रतिस्पर्ध्यांच्या "रंगा'वरून जर शेरेबाजी होत असेल, तर तो मूर्खपणा आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेविषयी बोलताना रिचर्डस म्हणाले की, यंदाच्या मोसमातील भारतासाठी ही सर्वांत कठीण मालिका होती. मायदेशात मिळवलेले यश जर विराट सेनेने इंग्लंड व ऑस्ट्रेलियात मिळवले, तर सर्वोत्तम श्रेणीत त्यांची नोंद होईल. मायदेशात यंदा 13 पैकी 10 कसोटींत विजय मिळवल्यानंतर विराटचे पुढील उद्दिष्ट परदेशांतील आव्हानांचा सामना करणे हे असेल. असेच यश जर इंग्लंड, ऑस्ट्रेलियात मिळवले, तर भारताचा हा संघ चॅंपियन ठरेल.

सीमारेषा वाढवा
येत्या काही महिन्यांत बॅटच्या जाडीवर मर्यादा येणार आहेत. या संदर्भात विचारले असता रिचर्डस म्हणाले की, बॅटच्या सध्या वाढलेल्या जाडीवर मर्यादा आणण्यापेक्षा सीमारेषा लांब करा. बॅटच्या कडेला लागलेले चेंडूही 60 ते 65 यार्डांवरील सीमारेषेच्या बाहेर सीमापार होतात; परंतु हीच सीमारेषा किमान 80 यार्डांवर असेल, तर फलंदाजालाही ताकदीचा वापर करावा लागेल.

Web Title: virat admirable aggression