विराटच्या वाढदिवशी हार्दिकने घेतला बदला

वृत्तसंस्था
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

विराटने केक कापून झाल्यानंतर हार्दिकने त्याचा बदला घेतला. त्याने विराटच्या चेहऱ्याला केक लावून अक्षरशः त्याचा चेहरा पूर्ण केकने भरविला होता. 17 ऑक्टोबरला पांड्याचा वाढदिवस होता. तेव्हा पांड्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे केक लावण्यात आला होता.

राजकोट - भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला तरी कर्णधार विराट कोहलीचा वाढदिवस भारतीय क्रिकेटपटूंनी आनंदात साजरा केला. कोहलीच्या पूर्ण चेहऱ्याला केकने भरविण्यात आले होते.

विराट कोहलीचा आज (5 नोव्हेंबर) वाढदिवस असून, त्याने 29 व्या वर्षात पदार्पण केले आहे. विराटचा सध्याचा फॉर्म पाहता तो क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतरही रात्री 12 वाजता टीमने ड्रेसिंग रुममध्ये केक कापून विराटचा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडूनही विशेष आयोजन करण्यात आले होते.  

विराटने केक कापून झाल्यानंतर हार्दिकने त्याचा बदला घेतला. त्याने विराटच्या चेहऱ्याला केक लावून अक्षरशः त्याचा चेहरा पूर्ण केकने भरविला होता. 17 ऑक्टोबरला पांड्याचा वाढदिवस होता. तेव्हा पांड्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे केक लावण्यात आला होता. त्यावेळी, वर्षात प्रत्येकाचा वाढदिवस येतो...बदला घेतला जाईल असे पांड्या म्हणाला होता आणि घडलेही तसेच. विराटच्या बाबतीत असेच पहायला मिळाले. हार्दिकने विराटसोबतचा फोटो ट्विट केला आहे.