कोहलीसमोर स्टार्कचे आव्हान असेल : हसी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, त्याला रोखण्यासाठी गोलंदाजांना एकत्रित प्रयत्न करणे आवश्‍यक वाटत असले, तरी आगामी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याच्याकडे कोहलीसमोर सातत्याने आव्हान निर्माण करण्याची क्षमता आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माईक हसी याने व्यक्त केले. 

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, त्याला रोखण्यासाठी गोलंदाजांना एकत्रित प्रयत्न करणे आवश्‍यक वाटत असले, तरी आगामी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याच्याकडे कोहलीसमोर सातत्याने आव्हान निर्माण करण्याची क्षमता आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माईक हसी याने व्यक्त केले. 

सलग चार कसोटी मालिकेत द्विशतकी खेळी करून कोहलीने स्वतःचे नाव ब्रॅडमन यांच्या पंक्तीत नेऊन ठेवले आहे. अशा वेळी त्याला रोखणे एक आव्हानच मानले जाते. हसी म्हणाला, ''उपखंडातील वातावरणाचा फायदा उठवण्यात स्टार्क कुशल आहे. त्याच्याकडे नैसर्गिक वेग आणि तो नवा चेंडू चांगला स्विंग करू शकतो. रिव्हर्स स्विंगची कलाही त्याच्याकडे चांगली आहे. त्यामुळे मला खात्री आहे, की आगामी पूर्ण मालिकेत तो कोहलीसमोर आव्हान उभे करू शकतो. अर्थात, कोहलीला रोखणे हा एकत्रित नियोजनाचा एक भाग बनला आहे.'' 

आगामी मालिकेत स्मिथसमोर मुख्य कोणती आव्हाने असतील याबाबत हसी म्हणाला, ''भारतात खेळताना नेहमीच फिरकी गोलंदाजीचा सामना करण्याचे आव्हान असते. या वेळी वेगळे काही नाही; पण स्मिथ स्वतः उत्तमपणे फिरकी गोलंदाजी खेळतो. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांचा वापर करताना संयम आणि विश्‍वास दाखवणे आवश्‍यक आहे.'' 

सातत्यपूर्ण कामगिरीमुळे कारकिर्दीत 'मि. क्रिकेट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हसीने या वेळी दुबईतील प्रशिक्षण शिबिरातील नियोजनाचे खेळाडूंच्या कामगिरीत कसे रूपांतरित होते हे पाहायला मला आवडेल, असे सांगितले. तो म्हणाला, ''क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. विविध पद्धतीने ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी तयारी केली आहे. भरपूर 'होम वर्क'ही केले आहे. आता त्याचे मैदानात कामगिरीत रूपांतर व्हायला हवे.'' 

कोहलीच्या नेतृत्वाखाली आता भारतीय खेळाडूंना चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय झाली आहे. अलीकडेच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांपैकी एकही खेळपट्टी केवळ फिरकी गोलंदाजीलाच साथ देणारी दिसून आली नव्हती. 
- माईक हसी, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू 

Web Title: Virat Kohli India versus Australia Michael Hussy Mitchell Starc