कोहलीच्या आक्रमकतेस मुरड घालणार नाही:कुंबळे

पीटीआय
सोमवार, 4 जुलै 2016

बंगळूर - भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमकतेस मुरड घालणार नसल्याचे संघाचे नवनियुक्‍त प्रशिक्षक व जगप्रसिद्ध फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी आज (सोमवार) स्पष्ट केले. मात्र याचबरोबर "भारताचे राजदूत‘ म्हणून वावरत असलेल्या क्रिकेटपटूंना जबाबदारीचे भान असावयास हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

"कोहली याची आक्रमकता मला आवडते. मीसुद्धा असाच आक्रमक होतो. मात्र ही आक्रमकता खेळपट्टीवर दाखविण्याची आमची पद्धत बहुतेक निराळी आहे. अर्थातच आक्रमकतेस मुरड घालणे योग्य नाही. परंतु "भारताचे राजदूत‘ व संघाचा एक भाग म्हणून तुमच्यावर असलेल्या जबाबदारीचे भानही असावयास हवे. यासंदर्भातील मर्यादारेषेची जाणीव प्रत्येकासच आहे, अशी मला आशा आहे,‘‘ असे कुंबळे यांनी सांगितले. 

कुंबळे हे प्रशिक्षकपदी असताना भारतीय संघ आता लवकरच वेस्ट इंडिजशी चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या पार्श्‍वभूमीवर खेळामध्ये जास्तीत जास्त सातत्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे कुंबळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

क्रीडा

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता माध्यमांशी बोलल्याबद्दल श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी...

11.27 AM

मुंबई - भारतीय महिला संघाने जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेतील अखेरच्या लढतीत अझरबैजानला हरवले खरे; पण जॉर्जियाने अमेरिकेचा सहज...

09.45 AM

नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आणि गोलरक्षक पी. आर. श्रीजेश गुडघ्याच्या दुखापतीमुळे पाच महिने खेळू शकणार नाही. यामुळे...

09.45 AM