विंडीजच्या ड्‌वेन स्मिथची निवृत्ती

पीटीआय
शुक्रवार, 3 मार्च 2017

बार्बाडोस - वेस्ट इंडीजचा आक्रमक प्रवृत्तीचा फलंदाज ड्‌वेन स्मिथ याने बुधवारी सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पर्दापणाच्या कसोटीत शतक ठोकले होते. त्यानंतरही तो वन-डे क्रिकेट अधिक खेळला. स्मिथने कसोटीत १० सामन्यांत एका शतकासह ३२० धावा केल्या आहेत. स्मिथ १०५ एकदिवसीय सामने खेळला. यात त्याने ८ अर्धशतकांसह १५६० धावा, ६१ गडी बाद केले आहेत. त्याने ३३ टी २० सामन्यांत ३ अर्धशतकांसह ५८२ धावा केल्या. त्याने ७ गडी बाद केले आहेत.

क्रीडा

कोलंबो - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे प्रेमसंबंध सर्वांनाच माहिती असताना आता या दोघांच्या प्रेमाचे...

01.09 PM

मॅसन ओहायो - ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओस याने आपली घोडदौड कायम राखत सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक...

10.12 AM

मुंबई - भारतीय कुस्ती संघाला सोमवारी सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेत चार ते पाच पदकांची आशा आहे. ही पदके प्रामुख्याने फ्रीस्टाईल...

10.12 AM