महिलांची दिवस-रात्र कसोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

लंडन - ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघांमध्ये यावर्षी होणारी "ऍशेस' मालिका ऐतिहासिक ठरणार आहे. या मालिकेतील एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळविण्यात येईल. मालिकेत प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी- 20 सामने होणार असून, एकमात्र कसोटी सामना दिवस-रात्र खेळविला जाईल. हा सामना यावर्षी 9 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ओव्हल येथे खेळविण्यात येणार आहे. मालिकेस 22 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या एकदिवसीय सामन्याने सुरवात होईल. "ऍशेस' विजेतेपदाचा निर्णय हा मालिकेतील विजयांना मिळणाऱ्या गुणांवरून ठरेल. कसोटी जिंकल्यास चार गुण मिळतील. त्याचवेळी प्रत्येक एकदिवसीय आणि टी- 20 सामन्यातील विजयास दोन गुण मिळणार आहेत. महिला विभागात सध्या "ऍशेस' ऑस्ट्रेलियाकडे आहेत. त्यांनी 2015 मध्ये मालिका जिंकली होती.
Web Title: women day-night test match