युवराजची सुपरपॉवर; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

युवराजसिंगने या दोन दिवसांच्या कालावधीत चांगली धमाल केल्याचे दिसून येते. त्याने स्वतः सोशल मिडियावर यासंबंधीचा एक व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओमध्ये युवराज दाराला हात न लावता दार उघडत असल्याचे दिसत आहे.

लंडन - भारताचा मधल्या फळीतील तडाखेबंद फलंदाज युवराजसिंगने आपल्या बॅटने नेहमीच कमाल केली आहे. मात्र, आता तो चक्क दाराला हात न लावता आपल्याकडील सुपरपॉवर वापरून दरवाजा उघड-बंद करत असल्याचा व्हिडिओ त्याने फेसबुकवर शेअर केला आहे.

युवराजसिंगने या दोन दिवसांच्या कालावधीत चांगली धमाल केल्याचे दिसून येते. त्याने स्वतः सोशल मिडियावर यासंबंधीचा एक व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओमध्ये युवराज दाराला हात न लावता दार उघडत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओला युवराजने गमतीदार 'कॅप्शन'ही दिले आहे. त्यात तो म्हणाला आहे, "जेव्हा आपल्याकडे 'सुपरपॉवर' असल्याचा आपल्याला भास होतो''. युवराजचा हा व्हिडिओ विराट कोहलीने शूट केला आहे.

चँपियन्स करंडक स्पर्धा अंतिम टप्प्यावर आहे. गुरुवारी (ता. 16) उपांत्यफेरीत भारताची बांगलादेशविरुद्ध लढत आहे. दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर भारतीय खेळाडूंनी सरावापेक्षा विश्रांती घेण्यास पसंती दिली. भारतीय खेळाडू मागील काही महिने सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे खेळातील लय कायम राखण्यासाठी सरावापेक्षा विश्रांती घेण्यावर भर दिला.