फुटबॉल संघाचे स्थान दहा वर्षांतील सर्वोत्तम 

पीटीआय
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - भारतीय फुटबॉल संघाने लक्षणीय प्रगती करत जागतिक क्रमवारीत दहा वर्षांतील सर्वोत्तम स्थान पटकावले. भारतीय संघ आता 129 व्या स्थानी आहे. भारताची ही 2006 पासूनची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

भारताने दोन वर्षांत 42 क्रमांकाने प्रगती केली आहे. भारताने गेल्या वर्षी 16 पैकी 11 आंतरराष्ट्रीय लढती जिंकल्या. त्यात आपल्यापेक्षा खूपच सरस असलेल्या प्युएर्तो रिकोविरुद्धच्या विजयाचाही समावेश आहे. सरस मानांकनामुळे आशिया कप स्पर्धेच्या ड्रॉच्यावेळी भारतास पॉट दोनमध्ये ठेवण्यात येईल. यामुळे भारतास आशिया कप स्पर्धेस पात्र ठरण्याची आशा आहे. 

स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्याकडे 2015 च्या फेब्रुवारीत पुन्हा मार्गदर्शकपद सोपवण्यात आले. त्या वेळी भारत 171 व्या स्थानी होता. कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखालील पहिली लढत होण्यापूर्वीच म्हणजेच मार्चमध्ये भारत 173 व्या क्रमांकावर गेला होता. सरत्या वर्षात भारताने वेगाने प्रगती केली. 20 ऑक्‍टोबर 2016च्या मानांकनात 11 क्रमांकाने प्रगती केली होती, तर वर्षाअखेरच्या क्रमवारीत सहा वर्षांतील सर्वोत्तम स्थान मिळवले होते. 

दोन वर्षांत भारतीय फुटबॉलने चांगले यश मिळवले आहे. आम्ही जे लक्ष्य ठरवले होते, ते साधले आहे. अर्थात अजूनही खूप दूरचा टप्पा बाकी आहे. प्रवास योग्य दिशेने सुरू झाला आहे, हे नक्कीच म्हणता येईल, असे कॉन्स्टंटाईन यांनी सांगितले. फुटबॉल संघाबाबत महासंघाने मला अधिकार दिले. हे सांघिक यशच आहे, असेही त्यांनी सांगितले.