क्रोएशिया विश्‍वकरंडकासाठी पात्र 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

स्वित्झर्लंडही मुख्य फेरीत 
बासेल येथील सामन्यात स्वित्झर्लंडनेही प्ले-ऑफच्या परतीच्या लढतीत नॉर्दन आयर्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखून विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. स्वित्झर्लंडने पहिल्या फेरीत रविवारी नॉर्दन आयर्लंडवर 1-0 असा विजय मिळविला होता. याच सरासरीवर त्यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला. स्वित्झर्लंड सलग चौथ्यांदा मुख्य स्पर्धेत खेळेल, तर नॉर्दन आयर्लंड 1986 नंतर प्रथमच मुख्य स्पर्धेसाठी अपात्र ठरले.

पिराएयूस : क्रोएशियाने प्ले-ऑफ लढतीच्या परतीच्या लढतीत ग्रीसला गोलशून्य बरोबरीत रोखून विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी प्ले-ऑफ लढत 4-1 अशी जिंकली. 

झ्लाटको डेलिच यांच्या मार्गदर्शनाखाली क्रोएशिया संघ आता पाचव्यांदा विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळेल. क्रोशियाने पदार्पण केल्यापासून ते केवळ 2010 मध्ये मुख्य स्पर्धेसाठी अपात्र ठरले होते. डॅलिच यांनी गेल्याच महिन्यात संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. अँटे सॅसिच यांची हकालपट्टी करून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्या लढतीत 1-0 असा विजय मिळविला असता, तर आम्हाला हा सामना कठीण गेला असता. त्यामुळे पहिल्या लढतीत मिळविलेला मोठा विजयच निर्णायक ठरला, असे मत डॅलिच यानी व्यक्त केले. 