फुटबॉल महासंघावर भुटियाची पुनर्नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

कोलकता - माजी कर्णधार बायचुंग भुटियाची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) सल्लागारपदी पुनर्नियुक्ती झाली. गेल्या डिसेंबरमध्ये त्याचा करार संपला होता. त्याचे नूतनीकरण झाले नव्हते.

कोलकता - माजी कर्णधार बायचुंग भुटियाची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) सल्लागारपदी पुनर्नियुक्ती झाली. गेल्या डिसेंबरमध्ये त्याचा करार संपला होता. त्याचे नूतनीकरण झाले नव्हते.

गेल्या महिन्यात तांत्रिक समितीवरूनही त्याला हटविण्यात आले होते. त्याच्याऐवजी नामवंत फुटबॉलपटू श्‍याम थापा यांची नियुक्‍ती झाली होती. भुटियाने सांगितले की, "मी करार एका वर्षाने वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. आम्ही आता ग्रासरुट उपक्रमावर भर देऊ. माझ्या पहिल्या कार्यकाळात मी याच क्षेत्रावर भर दिला होता.'