फ्रान्ससाठी बेल्जियम संघातील 'फ्रेंच कनेक्‍शन'

France vs Belgium football worldcup
France vs Belgium football worldcup

सेंट पीटर्सबर्ग : बेल्जियम आणि फ्रान्स विश्‍वकरंडक उपांत्य फेरीत आमनेसामने येतील तेव्हा केवळ एक फ्रेंच बेल्जियमच्या बाजूने असेल. हा फ्रेंच कुणी साधासुधा नसून थेट जगज्जेता आहे; पण आता तो बेल्जियमचा सहायक प्रशिक्षक आहे. त्याचे नाव थिएरी हेन्री!

हेन्री 1998च्या स्पर्धेत विश्‍वकरंडक जिंकलेल्या संघात होता. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 123 सामन्यांत 51 गोल अशी कामगिरी त्याने केली. 2000 मध्ये तो युरो करंडक विजेतासुद्धा बनला. अनेक फ्रेंच मुलांसाठी तो प्रेरणास्थान बनला. विद्यमान फ्रेंच प्रशिक्षक डिडीएर डेसचॅम्प्स यांच्या साथीत तो खेळला. विशेष म्हणजे हे दोघे संघात असताना फ्रान्स 21 सामन्यांत अपराजित राहिला. 16 विजय आणि पाच बरोबरी अशी कामगिरी त्याने केली. हे दोघे युव्हेंट्‌सकडूनसुद्धा एकत्र खेळले. डेसचॅम्प्स यांच्यापेक्षा हेन्री नऊ वर्षांनी लहान आहे; पण दोघांना एकमेकांविषयी आदर वाटतो.

मंगळवारी मात्र हेन्री मैदानावर फ्रेंच बेंचपासून काही पावले दूर बसलेला असेल. फ्रान्स पराभूत व्हायला हवे असे त्याला कारकिर्दीत प्रथमच वाटत असेल. डेसचॅम्प्स म्हणाले की, "हे थोडे विचित्र आहे, कारण तो फ्रेंच आहे; पण तो प्रतिस्पर्धी बेंचवर असेल. त्याच्यासाठीसुद्धा हे विचित्र असेल.

बेल्जियमच्या आघाडी फळीचा "मेंटॉर' अशी जबाबदारी हेन्रीवर सोपविण्यात आली आहे. याविषयी फ्रेंच खेळाडू ऑलिव्हर जिरूड याचीही भावना डेसचॅम्प्स यांच्यासारखीच आहे. तो म्हणाला की, "हेन्री बेल्जियन खेळाडूंना नेमका आणि महत्त्वाचा सल्ला देतो. तो आमच्याबाजूने असणे आणि मला सल्ला देणे मला नक्कीच आवडले असते. अर्थात, तुम्ही त्याचा द्वेष करू शकत नाही. माझ्यासाठी हे धक्कादायक नाही. त्याने चुकीचा संघ निवडला हे दाखवून देण्यास मला अभिमान वाटेल. त्याच्यासाठी हा सामना खास असेल.'

ऑफरच नाही...
फ्रान्सऐवजी बेल्जियम संघासाठी काम करण्याचा निर्णय घेतला का, असे विचारणाऱ्यांना हेन्री वारंवार नकार देतो. तो म्हणतो, फ्रान्सने मला कधी कुठल्या पदाची "ऑफर'च दिली नाही. याविषयी फ्रेंच फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नोएल ली ग्राएट यांनी मात्र सांगितले की, "आम्ही त्याच्याबरोबरील सहवासच गमावला. संघटनेशी त्याचा फार थोडा संपर्क आहे. जीवन असेच असते. तो दीर्घ काळ इंग्लंडमध्ये राहिला आहे.'

"हॅंडबॉल'नंतर एकाकी
क्‍लब कारकिर्दीत आर्सेनलकडून दीर्घ काळ खेळलेल्या हेन्रीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कारकिर्दीचा शेवट मात्र कटू झाला. 1998 मध्ये मायदेशात विश्‍वकरंडक जिंकलेल्या संघाच्या यशात हेन्रीचे योगदान मोलाचे होते. तेव्हा तो केवळ विशीत होता. 2009 मध्ये मात्र 2010च्या विश्‍वकरंडक पात्रता फेरीत आयर्लंडविरुद्ध त्याने चेंडू हाताळला. त्यामुळे त्याला फ्रेंच फुटबॉलप्रेमींचा रोष ओढवून घ्यावा लागला. त्यानंतर आपल्या जवळच्या लोकांनीही पाठ फिरविल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. योगदान दिल्यानंतरही आपल्याला उचित असा निरोप देण्यात आला नाही, याचे दुःखही त्याला झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com