'निवृत्त' लिओनेल मेस्सी पुन्हा मैदानात..!

पीटीआय
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

मेंडोझा :‘ कोपा‘ स्पर्धेतील अपयशानंतर निवृत्तीची घोषणा करणाऱ्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने गुरुवारी विश्‍वकरंडक पात्रता फेरीत उरुग्वेविरुद्ध मैदानात उतरत निवृत्तीच्या माघारीवर शिक्कामोर्तब केले. केवळ मैदानात उतरून नव्हे, तर सामन्यातील एकमात्र विजयी गोल करून त्याने अर्जेंटिनासाठी आपण जणू "ऑक्‍सिजन‘च असल्याचे दाखवून दिले. 

दहा खेळाडूंसह खेळावे लागलेल्या अर्जेंटिनाला मेस्सीच्याच गोलने उरुग्वेविरुद्ध विजयी केले. या विजयाने सात सामन्यानंतर 14 गुणांसह अर्जेंटिना दक्षिण अमेरिका गटातून अव्वल स्थानावर आले आहे. 
 
पूर्ण सामन्यात गोल करण्याच्या काही संधी निर्माण करणाऱ्या मेस्सीनेच मध्यंतराला तीन मिनिटे बाकी असताना उरुग्वेच्या बचावपटूंना चकवून थेट किक मारत गोल नोंदवला. त्याच्या किकने गोलकक्षात असणाऱ्या जोस मारिआ गिमेने आणि गोलरक्षक फर्नांडो मुस्लेरा यांना चकवले. अर्जेंटिनासाठी त्याने केलेला हा 56वा गोल ठरला. त्यापूर्वी अर्जेंटिनाच्या पावलो डिबाला याला दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले. त्याआधी त्याने 31व्या मिनिटाला अर्जेंटिनाचे खाते जवळ जवळ उघडलेच होते. पण, चेंडू गोलपोस्टला धडकून बाहेर गेला. 
 
उरुग्वेने पहिल्या सत्रात कमालीचा बचावात्मक खेळ केला. उत्तरार्धात त्यांनी अर्जेंटिनाला दडपणाखाली ठेवले. पण, त्यांना अर्जेंटिनाचा गोलरक्षक सर्गिओ रोमेरो याला चकवता आले नाही. अर्जेंटिना आता गुरुवारी व्हेनेझुएलाशी खेळणार आहे. त्यांच्या गटात उरुग्वे दुसऱ्या, कोलंबिया तिसऱ्या आणि इक्वेडोर चौथ्या स्थानावर आहे.

फोटो गॅलरी