मेस्सीच्या हॅटट्रिकमुळे अर्जेंटिना 'वर्ल्ड कप'साठी पात्र 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

बुनोस आयर्स : गेल्या पाच दशकांत प्रथमच विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र न ठरण्याची नामुष्की अर्जेंटिनाच्या संघावर येणार होते.. दक्षिण अमेरिका गटातील पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात अर्जेंटिनाला मोठ्या फरकाने विजय आवश्‍यक होता.. अशा वेळी पुन्हा एकदा लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाच्या मदतीला धावून आला. इक्वेडोरविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने हॅटट्रिक करत अर्जेंटिनाला 3-1 असा विजय मिळवून दिला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 2018 मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील स्थान पक्के केले. 

दक्षिण अमेरिका गटातील पहिले चार संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार होते. पाचव्या क्रमांकावरील संघ 'प्ले-ऑफ'साठी न्यूझीलंडविरुद्ध खेळेल आणि त्यातून एक संघ विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरेल. 

या फेरीत काल (मंगळवार) झालेल्या सामन्यापूर्वी अर्जेंटिना सहाव्या क्रमांकावर होते. त्यामुळे अर्जेंटिनाला इक्वेडोरविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावाच लागणार होता. 2001 नंतर अर्जेंटिनाने प्रथमच इक्वेडोरविरुद्ध विजय मिळविला. यामुळे अर्जेंटिनाला थेट प्रवेश मिळविणे शक्‍य झाले. 

दक्षिण अमेरिका गटात ब्राझील 41 गुणांसह अव्वल स्थानी आहे. ब्राझीलचा प्रवेश यापूर्वीच निश्‍चित झाला होता. पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात उरुग्वेने बोलिव्हियावर 4-2 असा विजय मिळविला, तर कोलंबियाने पेरूविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली. यामुळे या गटातून ब्राझील (41), उरुग्वे (31), अर्जेंटिना (28) आणि कोलंबिया (27) हे संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरले. पाचव्या क्रमांकावर राहिलेल्या पेरूला आता न्यूझीलंडविरुद्ध लढावे लागणार आहे.