गतउपविजेत्या मालीचा गोल वर्षाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - चेंडूवरील वर्चस्व नव्हे, तर गोलच्या संधी साधणे हे जास्त महत्त्वाचे असते, हा धडा देत गतउपविजेत्या मालीने तुर्कस्तानला ३-० असे सहज हरवले. चेंडूवर वर्चस्व राखले, तर विजय लाभतो, हेच कायम फुटबॉलमध्ये सांगितले जाते, मालीने चेंडूवर केवळ ४७% वर्चस्व राखले; पण त्यांनी तीन गोल केले. मालीने गोल करण्याचे तब्बल २९ प्रयत्न केले; पण त्यांना तीनच गोल करता आले. जेमोसा त्रॅऑर याने ३८ व्या मिनिटास खाते उघडले आणि त्यानंतर एनदिये आणि कॉनेत यांनी भरपावसात गोल केले.
 प्रेक्षकांत मोठ्या प्रमाणावर घट

डी. वाय. पाटील स्टेडिअमवरील दुसऱ्या दिवसाच्या लढतीस प्रेक्षकांत चांगलीच घट झाली. पहिल्या दिवशी अधिकृत आकडेवारीनुसार जवळपास १९ हजार चाहते होते, तर आज हीच संख्या ११ हजार ८०० पर्यंत खाली घसरली. आजही अनेक मुलांनी आपल्या सॅक, रिक्षा, तसेच अन्य साहित्य स्टेडियममध्ये नेण्यास प्रवेश नाकारल्याने मैदानाकडे पाठ फिरवणेच पसंत केले. या गर्दीतही महापालिकेने तिकीट दिलेल्या मुलांचीच संख्या जवळपास दोन हजार होती.  त्यात डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्था, ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेच्या शाळांसह खासगी विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यातही परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी कमी आले आणि त्यातील काही विद्यार्थी तर पाऊस सुरू झाल्यावर लगेच घरी परतले. 

जी गोष्ट सहज फेकता येईल, अशी कोणतीही गोष्ट मैदानात नेण्यास जागतिक फुटबॉल महासंघाचा प्रतिबंध असतो. हा सुरक्षेचा भाग आहे. हे उपाय काही नवीन नाहीत. त्यात कोणतीही तडजोड होणार नसल्याचे संयोजक समितीने स्पष्ट केले आहे. रांगेत उभे राहून परतण्याची वेळ प्रेक्षकांवर येऊ नये यासाठी पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येत होत्या. मोबाईल चार्जर, इअरफोन या संदर्भात विशेष सूचना दिली जात होती. त्यातच नेरुळ, सीवूड्‌स तसेच जुईनगर या स्टेडियमनजीकच्या स्टेशनवर अनेक मुले तिकीट हातात आहे, पण पाठीवरील सॅकचे काय करायचे हा विचार करीत होती. त्यासाठी मित्रांना फोनही करीत होती; पण त्यातील अनेकांची मोहीम संबंधित मित्रांचे घर लांब असल्यामुळे विफल ठरत होती.

दोन स्वयंगोलनंतरही विजय
पॅराग्वे-न्यूझीलंड लढतीतील सर्व सहा गोल पॅराग्वेच्या खेळाडूंकडून झाले; पण पॅराग्वेला ४-२ असा विजय लाभला. पॅराग्वेचा कर्णधार ॲलेक्‍स दुआर्ते याच्या दोन स्वयंगोलमुळे न्यूझीलंड विश्रांतीस आघाडीवर होते; पण बदली खेळाडू ॲनिबल वेगा याने चार मिनिटांत दोन गोल करीत पॅराग्वेला विजयपथावर नेले. ब्लास ॲरोमा याने भरपाई वेळेत गोल करीत पॅराग्वेचा विजय निश्‍चित केला.