युवा फुटबॉल संघाचे उद्यापासून लक्ष्य आशिया पात्रतेचे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - भारताचा सतरा वर्षांखालील संघ मायदेशातील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पूर्वतयारी करीत आहे, त्याच वेळी सोळा वर्षांखालील संघ आशियाई पात्रता स्पर्धेसाठी नेपाळमध्ये दाखल झाला आहे. ही स्पर्धा २० सप्टेंबरपासून सुरू होईल.

या वेळी पात्रता स्पर्धेद्वारेच पात्र ठरण्याचे आव्हान असेल. भारताचा समावेश ‘ड’ गटात आहे. या गटात नेपाळ, इराक आणि पॅलेस्टाईन हे ताकदवान संघ आहेत. भारताची सलामीची लढत २० सप्टेंबरला पॅलेस्टाईनविरुद्ध होईल.