कर्णधारपदासाठी खेळाडूंची अमरजित सिंगला पसंती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई / नवी दिल्ली - मणिपूरचा मध्यरक्षक अमरजित सिंग कियाम याला विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी सहकारी खेळाडूंनी पसंती दिल्याचे समजते. मार्गदर्शक लुईस नॉतॉन डे मातोस यांनी सध्या पूर्वतयारी शिबिरात असलेल्या २७ खेळाडूंना निवड करण्यास सांगितली होती.

मार्गदर्शक मातोस यांनी प्रत्येक खेळाडूला कर्णधारपदासाठी तीन नावे सुचवण्यास सांगितले. त्याच वेळी पहिल्या नावास पाच गुण, दुसऱ्या नावास तीन आणि तिसऱ्या नावास एक गुण देणार असल्याचे सांगितले. संघातील २७ पैकी २६ खेळाडूंनी आपल्या यादीत त्याचा समावेश केला होता. १९ खेळाडूंनी त्याला कर्णधारपदासाठी पहिली पसंती दिल्याचे समजते.

कर्णधारपदाच्या या निवडणुकीत जितेंद्र सिंगला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. गतवर्षीच्या आशियाई १६ वर्षांखालील स्पर्धेत कर्णधार असलेला सुरेश सिंग वॅंगजॅम याने या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविताना संजीव स्टॅलीनला मागे टाकले. 

मार्गदर्शक मातोस यांनी याबाबत थेट टिप्पणी करणे टाळले; पण कर्णधार कोण आहे हे खेळाडू जाणतात. खेळाडूंची आणि माझी पसंती एकच आहे, असे त्यांनी सांगितले. मातोस यांनी गोलरक्षक हा कोणत्याही परिस्थितीत कर्णधार नसेल, हे स्पष्ट केले होते.