स्वयंगोल होऊनही ब्राझील विजयी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

कोची - संभाव्य विजेत्या ब्राझीलने १७ वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत नाट्यमय विजयी सलामी दिली. पाचव्याच मिनिटाला स्वयंगोलमुळे पिछाडीवर पडल्यानंतरही त्यांनी स्पेनचे आव्हान २-१ असे परतावून लावले. ब्राझीलने दोन्ही गोल पूर्वार्धात नोंदवत बाजी मारली.

येथील नेहरू स्टेडियमवर ब्राझीलला प्रेक्षकांचे जोरदार प्रोत्साहन मळाले. पाचव्याच मिनिटाला वेस्ली याने स्वयंगोल केला. त्यामुळे स्पेनचे खाते विनासायास उघडले होते. अशा वेळी ड गटाच्या लढतीत ब्राझीलवर काहीसे दडपण आले होते; पण त्यांनी पूर्वार्धातच उपयुक्त आघाडी घेतली. लिंकनने २५व्या, तर पॉलीन्हो याने ४५व्या मिनिटाला गोल केले.

स्पेनने पहिली १५ मिनिटे त्यांनी चेंडूवर ताबा ठेवला होता; पण नंतर त्यांची पकड निसटली. त्यांच्या बचाव फळीचा नंतर निभाव लागला नाही. स्पेनला एकूण ११ कॉर्नर मिळाले. यातील दहा दुसऱ्या सत्रात मिळाले होते; पण त्यांना एकदाही संधीचे चीज करता आले नाही.  

नायजर विजयी
नायजरने उत्तर कोरियाला १-० असे हरविले. ५९व्या मिनिटाला सलीम अब्दूरहमान याने केलेला गोल निर्णायक ठरला.

Web Title: sports news worldcup football competition

टॅग्स