इराण बाद फेरीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मडगाव - अप्रतिम आक्रमक खेळ केलेल्या इराणने निष्प्रभ जर्मनीचा फडशा पाडत फिफा १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ‘राउंड ऑफ १६’ फेरीतील (बाद फेरी) स्थान निश्‍चित केले. ‘क’ गटात सलग दुसरा विजय नोंदविताना आशियाई संघाने युरोपियन संघाचा ४-० असा धुव्वा उडविला. 

नेहरू स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या या लढतीत इराणचे वर्चस्व राहिले. अब्बास चामानियन यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी दोन गोल नोंदविले. पूर्वार्धात युनीस डेल्फी याने दोन वेळा गोलजाळीचा वेध घेतला. त्याने पहिल्यांदा सहाव्या मिनिटास, तर नंतर ४२व्या मिनिटास चेंडूला गोलजाळीची अचूक दिशा दाखविली. स्पर्धेतील वैयक्तिक दुसरा गोल नोंदविताना अल्लाह्यार सय्यद याने ४९व्या मिनिटास भेदक हेडरद्वारे लक्ष्य साधले. बदली खेळाडू वाहिद नामदारी याने ७५व्या मिनिटाला इराणच्या खाती चौथ्या गोलची भर टाकली. गोलरक्षक लुका प्लोगमन याच्या सरस कामगिरीमुळे जर्मनीचा मोठा पराभव टळला.