विराटला तंदुरुस्तीचा विश्‍वास

Virat is sure about his fitness
Virat is sure about his fitness

नवी दिल्ली, ता. 22 ः ""मी शंभर टक्के तंदुरुस्त असून इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास सज्ज आहे, कधी एकदा मैदानावर उतरतो याची उत्सुकता लागून राहिली आहे,'' शब्दांत भारतीय कर्णधार विराट कोहलीने तंदुरुस्तीबाबतचा आत्मविश्‍वास व्यक्त केला. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ रवाना होण्याच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली हा विश्‍वास व्यक्त करत होता.

आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर कोहलीच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. मानेच्या दुखापतीमुळे त्याने इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सरे क्‍लबशी केलेला करारही रद्द केला.
माझी मान पूर्णपणे बरी आहे. मी आता शंभर टक्के तंदुरुस्त आहे. मुंबईतील डॉक्‍टरांकडे मी सहा ते सात सेशन्स केली. मी तंदुरुस्ती चाचणीही दिली आहे. सातत्यान एवढे क्रिकेट खेळल्यानंतर पुन्हा कधी एकदा मैदानात जातोय, असे मला झाले आहे. खर तर हा ब्रेक फायदेशीरच ठरला. असे कोहलीने सांगितले.

इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी मला तेथे जाऊन हवामान आणि परिस्थितीशी मिळते जुळते घ्यायचे होते, त्यामुळे मी सरे क्‍लबबरोबर करार केला होता. चार वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यात आम्ही क्षमतेनुसार कामगिरी करू शकलो नव्हतो. ते सर्व अपयश धुऊन काढण्यासाठी मला पुजारा आणि इशांत शर्मासारखी तयारी करायची होती, असे कोहलीने सांगितले.

इंग्लंड दौऱ्यात भारत पाच कसोटी आणि तीन एकदिवसीय आणि तीन ट्‌वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 2002 नंतर प्रथमच पहिल्यांदा मर्यादित षटकांचे क्रिकेट होणार आहे आणि त्यानंतर कसोटी मालिका होणार आहे. त्याअगोदर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन ट्‌वेन्टी-20 सामने खेळणार आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com