विजयासह मुंबई सर्वप्रथम उपांत्य फेरीत

mumbai-city
mumbai-city


पणजी - मुंबई सिटी एफसीने यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ हा मान मिळविला आहे. त्यांनी गतविजेत्या चेन्नईयीन एफसीवर २-० अशी मात केली. सामना मुंबई येथील फुटबॉल अरेनावर बुधवारी झाला. 
मातियस डिफेडेरिको याने ३२व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे मुंबई सिटीने आघाडीवर घेतली, नंतर उत्तरार्धात ख्रिस्तियन वाडोच याच्या जबरदस्त गोलमुळे मुंबई सिटीची आघाडी वाढली. हा गोल ६०व्या मिनिटास झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com