नेमार खेळला; ब्राझील ‘टेंशन फ्री’

Nemar
Nemar

लिव्हरपूल - मैदानात उतरल्यावर २३ व्या मिनिटास गोल करीत नेमारने गोल केला आणि आपण विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी जण्‌ू तंदुरुस्त होत असल्याची ग्वाही चाहत्यांना दिली. 

तीन महिन्यांपूर्वी नेमारच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर प्रथमच स्पर्धात्मक लढत खेळताना त्याने गोल केला. त्याच्या या गोलचीच चर्चा ब्राझील-क्रोएशिया लढतीनंतर झाली. ब्राझीलचा २-० विजय दर्शवणारा गोलफलक ही काहीसा दुर्लक्षितच झाला. त्याचा खेळ पाहून ब्राझीलचे चाहतेच नव्हे, तर संघ सहकारी, मार्गदर्शक टिटे हेही सुखावले होते. त्यांचे टेन्शन दूर झाले होते. 

नेमारसारखा खेळाडू संघात परतला, तर कोणत्याही संघावरील दडपण दूर होणार. आमचा संघ ग्रेट आहे, पण नेमार खूपच महत्त्वाचा आहे. तो असला की लढत कितीही खडतर असली, तरी त्यास सामोरे जाण्याची तयारी होते, असे ब्राझीलचा बचावपटू थिएगो सिल्वा याने सांगितले.

नेमारची मैदानातील उपस्थिती काय करू शकते, हे सहज दिसले. पूर्वार्धात नेमार नव्हता, तर क्रोएशियाचा बचाव भेदण्याची किल्लीच ब्राझीलला गवसत नव्हती. नेमार मैदानात उतरल्यावर सर्वच चित्र बदलले. नेमारने विलियन आणि गॅब्रिएलच्या साथीत क्रोएशियाचा बचाव कोलमडला. नेमारच्या कामगिरीने लढतीसाठी आलेल्या ३५ हजार ब्राझील चाहत्यांचाही संघावरील विश्‍वास वाढला. 

ब्राझीलमधील नामवंत संगीतकार डॅनियल अद्रायिनो ब्राझीलच्या पूर्वार्धातील खेळाने चिडले होते. ‘ नेमार नसेल, तर आम्ही नक्कीच जिंकणार नाही. त्याच्या खेळाने ब्राझील विश्‍वकरंडक जिंकू शकतो, असा विश्‍वास आला आहे. तो एवढा चांगला खेळेल, असे वाटले नव्हते,’  असे त्यांनी सांगितले. लढतीरपूर्वी नेमार ऑस्ट्रियाविरुद्ध सुरवातीपासून मैदानात उतरणार का, याची चर्चा सुरू होती; पण ब्राझीलचे मार्गदर्शक टिटे यांनी याबाबत मौनच बाळगले.

क्रोएशियाने आम्हाला चांगलेच दडपणाखाली आणले होते, पण नेमार मैदानात आल्यावर सर्वच चित्र बदलले. मात्र, त्याचा खूप हुशारीने वापर करणार आहोत. त्यासाठी चर्चा करणार आहोत. 
- टिटे, ब्राझील मार्गदर्शक.

पुन्हा फुटबॉल मैदानावर उतरलो, त्यामुळे खूप खूश आहे. त्यासाठी खूप प्रतीक्षा केली, तसेच कष्टही घेतले आहेत. तीन महिने कसे काढले, तेही सांगता येणार नाही. गोल केला, त्या वेळी मला सावरण्यास मदत करणाऱ्या डॉक्‍टरांचे, मित्रांचे, कुटुंबीयाचेच विचार मनात आले. 
- नेमार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com