भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

ढाका : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात आज (गुरुवार) भारताने पाकिस्तानचा 3-1 असा दणदणीत पराभव करत थाटातच अंतिम फेरी गाठली. 

या सामन्यात सुरवातीपासूनच भारतीय संघाने वर्चस्व राखले. सामन्याच्या सुरवातीलाच गोल करत भारतीय संघाने आघाडी घेतली. त्यानंतर पूर्वार्ध संपण्यास काही मिनिटे बाकी असतानाच भारताने दुसरा गोल केला. मध्यंतरास भारताकडे 2-0 अशी आघाडी होती. भारताच्या आक्रमक खेळास उत्तर देणे पाकिस्तानला शक्‍यच झाले नाही. 

उत्तरार्धातही भारताने गवसलेला सूर कायम राखत तिसरा गोलही केला. यामुळे पाकिस्तानच्या संघावरील दडपण प्रचंड वाढले होते. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना पाकिस्तानने एक गोल करत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण हा अपवाद वगळता पाकिस्तानला आणखी संधी साधता आल्या नाहीत. उर्वरित दहा मिनिटे भारताने दोन गोलांची आघाडी कायम राखली. 

चौथी 18 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धा 
उपांत्य फेरी 
भारत 3-1 पाकिस्तान