आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारताची सलामी जपानशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई - आशिया कप हॉकी स्पर्धेस उद्या (ता. ११) ढाक्‍यात सुरवात होईल, ते भारतच ही स्पर्धा जिंकणार हे गृहीत धरूनच. स्पर्धा ढाक्‍यात होत असूनही चाहत्यांचा सर्वाधिक पाठिंबा भारतास लाभणार आहे. अर्थात, भारतासाठी सलामीची लढत पाकिस्तानविरुद्धच्या आगामी लढतीसाठी एक प्रकारे पूर्वतयारीच असेल.

भारतीय हॉकी संघासाठी कोणत्याही स्पर्धेतील सलामीची लढत खडतर असते. नेमके हेच भारतीय कर्णधार मनप्रीत सिंग सांगत आहे. कोणत्याही स्पर्धेतील सलामीची लढत आव्हानात्मक असते. या लढतीतच सूर गवसणे महत्त्वाचे आहे. प्रमुख मैदानावरील सराव चांगला झाला आहे. आम्ही स्पर्धेसाठी तयार आहोत, असे भारताचा कर्णधार मनप्रीत सिंगने सांगितले. जपान दुबळा संघ नाही. त्यांनी सुलतान अझलान शाह स्पर्धेत भारतास ४-३ झुंज दिली होती, तर ऑस्ट्रेलियास हरवले होते. त्यांना कमी लेखण्यास भारतीय संघही तयार नाही. काही महिन्यांत जपानने चांगली प्रगती केली आहे, असे मनप्रीतने सांगितले. भारताने या स्पर्धेसाठी बचावफळीत जखमी कोथाजित सिंगऐवजी अमित रोहिदासला खेळवण्याचे ठरवले आहे.

रोहिदासला युरोप दौऱ्याचा अनुभव आहे, याकडे मनप्रीत लक्ष वेधत आहे. 
दरम्यान, या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग आहे. त्यातून भारत, पाकिस्तान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे अव्वल साखळीत प्रवेश करतील असा कयास आहे; पण चीन आणि जपानमध्ये ही समीकरणे बिघडवण्याची नक्कीच ताकद आहे. 

भारत या स्पर्धेतील अव्वल मानांकित आहे. त्यांनाच ही स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. भारत सोडल्यास अन्य लढतीत काहीही होऊ शकते. आम्हीही अर्थात केवळ स्पर्धा सहभागासाठी येथे आलेलो नाही. एखाद-दुसरा धक्का देण्याचे आमचेही लक्ष्य आहे.
- सिएगफ्राईड ऐकमान, जपानचे मार्गदर्शक