महिला हॉकीत भारताची हार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई - भारतीय महिला संघ वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्याच्या स्पर्धेत इंग्लंडला आव्हानही देऊ शकला नाही. भारतास या लढतीत १-४ अशा एकतर्फी पराभवास सामोरे जावे लागले. आता भारतीय संघ पाच ते आठ क्रमांकासाठी खेळणार आहे.

जोहान्सबर्ग येथील या स्पर्धेतील भारत पहिल्या तीन सत्रांनंतर ०-३ असा मागे पडला होता. चौथ्या सत्रातील भारताचा प्रतिकार खूपच तोकडा पडला. पहिल्या सत्रात दोन गोल स्वीकारल्यानंतर भारतीयांनी दुसऱ्या सत्रात चांगला प्रतिकार करताना दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण त्याचा फायदा घेता आला नाही. गोलच्या दवडलेल्या संधींनी भारताचा विजय दुरावतच गेला.