नेदरलॅंड्सविरुद्ध भारताचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

लंडन - ऑलिंपिक विजेत्या नेदरलॅंडस्‌च्या ताकदवान खेळास भारतीय हॉकी संघाने काही प्रमाणात हादरे दिले खरे, पण भारतास वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील या लढतीत १-३ अशी हार पत्करावी लागली. भारताचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे. 

भारतीय नेदरलॅंडस्‌ला कडवे आव्हान देतील असेच वाटत होते, पण रिओत बाजी मारलेल्या नेदरलॅंडस्‌ने आपली हुकुमत दाखवत बाजी मारली. पहिल्या दोन सत्रात त्यांनी वेगवान खेळ करीत भारतावरील दडपण वाढवले. त्यांनी सोळा मिनिटात तीन गोल केले होते, याच कालावधीत आकाश चिकटेने तीन गोल रोखले होते, अन्यथा या लढतीचा निर्णय या पंधरा मिनिटांच्या सत्रातच झाला असता. विजेत्यांच्या थिएरी ब्रिंकमन, सॅंडर बार्ट आणि मिर्को प्रुईजेर यांनी प्रत्येकी एक गोल केला. 

आकाशदीपने दुसरे सत्र संपण्यास दोन मिनिटे असताना गोल करीत भारताच्या आशा ऊंचावल्या, पण उत्तरार्धात नेदरलॅंडस्‌ने क्वचितच भारतास प्रतिआक्रमणाची संधी दिली. भारतास अखेर ब गटातील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.