गोलच्या संधी दवडत भारताची हार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

कॅनडाविरुद्धच्या पराभवामुळे सहाव्या स्थानी

लंडन - गोल दवडण्याची एकमेकांशी स्पर्धा करीत भारताने वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील कॅनडाविरुद्धच्या पाचव्या क्रमांकाच्या लढतीत २-३ पराभव ओढवून घेतला. या स्पर्धेत पहिल्या दोन संघांत येण्याचे लक्ष्य बाळगलेल्या भारताने प्रत्यक्षात या स्पर्धेत  दोन दुबळ्या संघांविरुद्ध हार पत्करली.

मलेशियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत हार पत्करलेले भारतीय पाकिस्तानविरुद्धच्या एकतर्फी विजयाने सावरले, असेच वाटत होते. प्रत्यक्षात विश्रांतीस घेतलेली २-१ आघाडी दवडत हार पत्करली. मलेशियाने भारताविरुद्ध विजय मिळविताना आक्रमणात वर्चस्व राखले होते; मात्र कॅनडाने केवळ सतरा टक्के गोलक्षेत्रात वर्चस्व राखले आणि त्यात तीन गोल करीत लढत जिंकली. या स्पर्धेच्याच प्राथमिक साखळीत भारताने कॅनडाचा ३-० असा पराभव केला होता. 

हॉकी आकडेतज्ज्ञांच्या भाषेत बोलायचे तर गॉर्डन जॉनस्टन याने दोन आणि कीगन परेरा याने एक गोल करीत कॅनडाचा विजय साकारला, तर भारताचे दोन्ही गोल हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर केले. या विजयामुळे कॅनडा स्पर्धेत केवळ पाचवे आले नाहीत, तर विश्वकरंडकास पात्र ठरले. भारतास वर्ल्ड हॉकी लीगप्रमाणेच विश्‍वकरंडक स्पर्धेतही आता यजमान म्हणूनच प्रवेश मिळणार आहे. भारताने या सामन्यात गोल करण्याच्या २० संधी दवडल्या. दहापैकी दोनच पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावले. भारतीय आक्रमकांनी चेंडूवर चांगली हुकूमत राखली. गोलक्षेत्रात वारंवार प्रवेश केला; मात्र कॅनडाचा गोलरक्षक अँतोनी किंडलर याने सुरवातीस चांगल्या चाली रोखल्यावर भारतीय आक्रमकांकडून चुका होण्यास सुरवात झाली.