राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्रास साधारण विजेतेपद

राजेश कळंबटे
रविवार, 21 जानेवारी 2018

डेरवण - एस व्ही जे सी टी क्रीडा संकुल डेरवण येथे सुरु असलेल्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राने ५० गुणांची कामे करीत सर्व साधारण विजेतेपद पटकावले.

डेरवण - एस व्ही जे सी टी क्रीडा संकुल डेरवण येथे सुरु असलेल्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राने ५० गुणांची कामे करीत सर्व साधारण विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या मुलींनी तब्बल ४३ गुण मिळवत तर मुलांच्या गटात दिल्लीने ३१ गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक संपादन केला.

या स्पर्धेत मुली गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान केंद्रीय विद्यालयाच्या गौतमी शेट्टीने तर मुलांच्या गटात विभागून दिल्लीच्या मनीष कुमार आणि शौर्य राजपूत यांनी संपादन केला. 

गेले तीन दिवस डेरवण येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक्स स्पर्धेचा आजचा चौथा आणि शेवटचा दिवस चुरशीचा ठरला. सर्वसाधारण विजेतेपदासाठी खेळाडू, प्रशिक्षक यांच्यात जोरदार रस्सीखेच दिसून येत होती. महाराष्ट्राने शेवटच्या दिवशी १ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य पदकाची कमाई  करीत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला. 

चौथ्या दिवशीच्या स्पर्धेचा निकाल (अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक)- ६०० मी. मुले- शौर्य राजपीत, दिल्ली (१:२५.७), शिव चौहान, दिल्ली (१:२६.२), शाम बिंद, यूपी (१:२६.५).  ६०० मी. मुली- गौतमी शेट्टी ,केंद्रीय विद्यालय (१:४१.१), लक्षिता सांडिला, गुजरात (१:४१. ५), ऋतुजा कांबळे, महाराष्ट्र (१:४२. १).

थाळीफेक मुले- अंकुश पुनादिर , पंजाब (५६. ५०), आर्य शहा, महाराष्ट्र ( ५१. १४), अमर गौंड, यूपी ( ५०. ००).

गोळाफेक मुली- यशश्री, राजस्थान (१०. १४), रुबरसी, तामिळनाडू (१०. ०८), विधी चौधरी, यूपी (१०. ०७).

उंचउडी मुले- प्रमोद,  हरियाणा ( १. ८६), भारत, केरळ (१.८४),मनीष, हरियाणा (१. ८२).

लांबउडी मुली- अभिनय, तामिळनाडू (५. २२), श्रुष्टि शेती, महाराष्ट्र (५. १४), विभा श्रीनिवास, कर्नाटक (४. ८५).

२०० मी. मुले- मनीष कुमार, दिल्ली(२३. २), रोशन कुमार, बिहार (२३. ५), विजय कश्यप, यूपी (२३. ७). २०० मी मुली- साक्षी चव्हाण, महाराष्ट्र ( २६. ०), स्नेहा, तामिळनाडू ( २६. ३), सिमरन कौर, चंदीगड ( २६. ७).

४+१०० मी रिले मुले- दिल्ली (४५. २), बिहार (४५. ९), महाराष्ट्र (४६. १) मुली- तामिळनाडू (५१. ४), महाराष्ट्र (५१. ९), पंजाब (५२. २)

Web Title: Ratnagiri News National School Athletic competition