‘सकाळ प्रीमियर लीग’चा थरार सुरू

‘सकाळ प्रीमियर लीग’चा थरार सुरू

नवीन पनवेल - पहिल्याच राज्यस्तरीय ‘सकाळ प्रीमियर लीग’ (एसपीएल)मीडिया चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २३) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कळंबोलीतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर ‘एसपीएल’चा थरार सुरू झाला असून तीन दिवस चौकार-षटकारांच्या आतषबाजी रंगणार आहे. 

पनवलेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती अमर पाटील, सभापती विद्या गायकवाड आदी मान्यवर उद्‌घाटन समारंभाला उपस्थित होते. क्रिकेटपटूंबरोबरच प्रेक्षकांचाही उत्साह ओसंडून वाहत होता. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि कळंबोलीतील रामदास शेवाळे सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘एसपीएल’ होत आहे.

स्पर्धेच्या उद्‌घाटनानंतर पहिल्या सामन्यात खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनी लहान विद्यार्थिनींसोबत मैदानात जात ‘बेटी बचाव बेटी पढाओ’चा संदेश दिला. उद्‌घाटनप्रसंगी परेश ठाकूर म्हणाले, की महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी म्हणून ‘सकाळ’ने लावलेला हातभार निश्‍चितच कौतुकास्पद आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती अमर पाटील आदींनीही क्रिकेटपटूंना शुभेच्छा दिल्या. उद्‌घाटन समारंभाला रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, नगरसेवक राजू शर्मा, नगरसेविका मोनिका महानवर, प्रमिला पाटील, शिवसेना नेते बबन पाटील, भाजप नेते विनोद साबळे, एकनाथ देशेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार ‘सकाळ’चे उप सरव्यवस्थापक (वितरण) दिनेश शेट्टी, साम मराठी वाहिनीचे संपादक निलेश खरे, मुख्य व्यवस्थापक जाहिरात विभाग (मुंबई) सुकेश मांजरेकर आदींच्या हस्ते झाला.

मी गाव-खेड्यातील अनेक क्रीडा स्पर्धा पाहतो. तेथील खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मनापासून वाटले. ‘साम’ टीव्ही महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी आहे. ‘सकाळ प्रीमियर लीग’सारखी स्पर्धा भरवण्याची संधी कळंबोलीतील नागरिकांना दिल्याबद्धल ‘सकाळ’चे आभार. 
- रामदास शेवाळे  अध्यक्ष, रामदास शेवाळे सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठान, कळंबोली

देशभक्तिपर गीतांचा नजराणा 
‘सकाळ प्रीमियर लीग’मध्ये देशभक्तिपर गीतांचा अनोखा नजराणा पाहायला मिळत आहे. ललित केशवण आणि सुनील सावंत यांचे पंच म्हणून अचूक निर्णय अन्‌ प्रवीण अर्जुने, प्रशांत पुजारी आणि महादेव गडगे यांच्या खुशखुशीत समालोचनाने स्पर्धेची रंगत वाढली आहे. 

झेल सोडणे महागात
ग्रामीण संघाचा अंतिम सामना आदईच्या रिया श्री गणेश आणि तुरमाळेच्या श्री गणेश संघांमध्ये होता. सामन्याचा पहिलाच चेंडू श्री गणेश तुरमाळे संघाच्या अक्षय चोरघे याने हवेत टोलवला. खराब क्षेत्ररक्षणामुळे रियाच्या संघाने झेल सोडला. या जीवदानानंतर अक्षय चोरघे याने गोलंदाजांची पिसे काढली. त्याने १४ चेंडूत ४० धावांची कमाई केली. त्यात पाच षटकार आणि एक चौकारही लगावला. अक्षयने शुक्रवारच्या सामन्यांमध्ये दोन वेळा सामनावीरचा किताब मिळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com