आयपीएलमुळे क्रिकेटचे अर्थकारण पूर्णपणे बदलले - अजित वाडेकर

आयपीएलमुळे क्रिकेटचे अर्थकारण पूर्णपणे बदलले - अजित वाडेकर

कोल्हापूर - आयपीएलमुळे क्रिकेटचे अर्थकारण पूर्णपणे बदलले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक क्रिकेटपट्टू पुढे येत असून त्यांना वरिष्ठ खेळाडू होण्याची संधी मिळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ खेळाडू अजित वाडेकर यांनी केले.

कोल्हापूर येथे दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ते येथे आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते. वाडेकर म्हणाले की, अति क्रिकेट होत असले तरी, त्यातून क्रिकेटपट्टूंचाही कस लागत आहे. जे शारिरिक तंदुरुस्त आहेत किंवा ज्यांच्या कामगिरीत सातत्य आहे. असेच खेळाडू भविष्यात टिकून राहतील. भारतीय संघामध्ये कोणत्याही खेळाडूची जागा कायम नाही. आयपीएलच्या माध्यमातून कामगिरी दाखवण्याची संधी नवोदित खेळाडूंना मिळाली आहे.

पैसा हा महत्त्वाचा आहे. आयपीएलने ही पर्वणी खेळाडूंना दिली आहे. इंग्लडमध्ये अशीच पद्धत पुर्वीपासून अस्तित्वात आहे. सर्वच संघामध्ये व्यावसायिकता आली आहे. बदलत्या काळानुसार हे योग्यच आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com